Chinchwad News : बांधकाम साईटवर काम करताना कामगाराचा मृत्यू; सुपरवायझरवर गुन्हा दाखल Pckhabar- बांधकाम साईटवर काम करत असताना एका कामगाराचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. कामगाराला सुरक्षितेची कोणतीच साधने न दिल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील जी. के. कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवर 26 डिसेंबर 2021 रोजी घडला. राजु उर्फ ...

Hinjewadi Crime News: लग्न समारंभातून सव्वा दोन लाखांचे दागिने असलेली पर्स चोरीला Pckhabar-नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेलेल्या महिलेची सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 2 लाख 22 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे 7 डिसेंबर रोजी घडली. श्रीमती सिमा हंबीरराव आडनाईक (वय-40, रा. सहकारनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली ...

Wakad Crime News : शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरूणाचा खून Pckhabar- शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाने तरूणाच्या डोक्यात लोखंडी अ‍ॅगलने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता वाकड येथील वर्व रेसिडेन्सी समोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गुरूनाथ सुतार (वय-23. रा. वाकड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात ...

Sangvi Crime News : सांगवीत दिवसाढवळ्या 14 लाखांची घरफोडी Pckhabar- बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील तीन लाखांची रोख रक्कम, 330 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 14 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे बुधवारी दुपारी सव्वा दोन ते साडेतीन दरम्यान घडली. कैलास चिधु सोनवणे (वय-61, रा. सोना अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, जुनी सांगवी) यांनी ...

Sangvi Crime News : ठेकेदाराला खंडणी मागणार्‍या एकाला अटक Pckhabar- रस्त्याचे काम करणार्‍या एका ठेकेदाराच्या कामगाराला काम करायचे असेल तर मला दररोज दोन हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा काम बंद पाडील, अशी दमदाटी करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे-गुरव येथे रविवारी दुपारी घडला. मोसिम बाबु सय्यद (वय-27, रा. दापोडी) ...

Pimpri Crime News : ‘मी इथला भाई आहे, धंद्दा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागेल’ म्हणणारा भाई जेरबंद Pckhabar- ’कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, धंद्दा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ असे म्हणत शिवीगाळ करून दहशत पसरविणार्‍या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास महेशनगर येथील नवीन चौपाटी येथे केली. दिपक उर्फ ...

Wakad Crime News : अ‍ॅडवान्स पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला लावली आग तीन लाखांचे नुकसान, कामगाराला अटक Pckhabar- अ‍ॅडवान्स पैसे दिले नाहीत म्हणून एका कामगाराने मालकाला शिवीगाळ करत दुकान आतून बंद करून तीन लाख रूपयांच्या साहित्याला आग लावून नुकसान केले. ही घटना थेरगाव येथे गुरूवारी दुपारी घडली. प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. बिदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ...

Nigdi crime news : बहिण भावाला रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेआठ लाखाला गंडविले Pckhabar-एका तरूणीने मी रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरीला असून एका महिलेला व तिच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखवून साडेसाठ लाख रूपये घेतले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली. ही घटना निगडी येथे उघडकीस आली आहे. संजीवनी निलेश पाटणे (वय-25, रा. जी. के. रोझ अस्टर, सी. ...

Pimpri Crime News : लग्नाच्या अमिषाने एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने महिलेसोबत ठेवले लैंगिक संबंध Pckhabar- महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने वेळोवेळी महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले. महिलेने कुठेही तक्रार करू नये म्हणून महिलेला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पिंपरी, गोवा, तिरूपती बालाजी येथे घडला.  याप्रकरणी 51 आणि 62, वर्षीय आरोपींवर ...

Crime News : घराला भगदाड पाडून चोरट्यांनी भरलेला गॅस सिलेंडर नेला चोरून Pckhabar- वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त असून चोरटे डिझेल, पेट्रोलसह आता गॅस सिलेंडरवरही डल्ला मारत आहेत. बंद घरात जमिनीमध्ये भगदाड पाडून अज्ञात चोरट्याने घरातील एलईडी टीव्ही, भरलेला गॅस सिलेंडर असा 18 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चाकण येथील ग्रामीण रूग्णालय परिसरातील शासकीय इमारतीमध्ये नुकतीच घडली. वसंत ...