Pimpri News : एचएसबीसी (HSBC) आणि विप्ला फाउंडेशनतर्फे गरजूंना किराणा वाटप Pckhabar- पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरात राहणाऱ्या अंध, अपंग, निराधार, विधवा, घरेलू आणि वंचित 150 कुटुंबाना आणि आणि पुणे शहरातील पर्वती, शिवाजीनगर, येरवडा येथील70 कुटुंबाना एच एस बी सी आणि विप्ला फाउंडेशन या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन महिने पुरेल इतका किराणा किट वितरित करण्यात आले. संस्थेच्या महिला, युवती ...

Pimpri News : शहरातील कंपन्या, हाउसिंग सोसायट्यांचे फायर ‘मॉकड्रील’ करा महापालिकेकडे भाजपाची मागणी Pckhabar-शहरात आगीच्या घटना घडत आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागावर मोठा ताण येत आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये जिवीत व वित्तहानी होते. हे नुकसान भरून येत नाही. त्यामुळे शहरातील हाउसिंग सोसायटी व विविध आस्थापनांमध्ये ‘मॉकड्रील’ करून आग नियंत्रणात आणण्यासाठीची प्रात्याक्षिके सादर करावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे करण्यात आली आहे. ...

Pimpri News : कलाविष्कार पाहण्याची संधी – महापौर महापौरांच्या हस्ते रंगयात्री महोत्सवाचे उद्घाटन Pckhabar-अनेक महिन्यांपासून बंद असलेली रंगमंदिरे खुली झाली आहेत. आता कलाकारांना आपली कला थेट प्रेक्षकांसमोर सादर करता येणार आहे. रंगयात्री महोत्सवाच्या  माध्यमातून कलाकारांचे कलाविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे असे प्रतिपादन महापौर  माई ढोरे यांनी केले. थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंच यांच्या वतीने आयोजित रंगयात्री – रसिककला ...

Pimpri News : चौकशीसाठी कोर्ट जामीन देत नसेल; तर तडफडण्याचे काम काय : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना टोला Pckhabar- महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही मात्र अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका. यांचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर  बोलतात. या ...

Pimpri News: फेरीवाला हक्कासाठी राज्यभर पाठपुरावा :  काशिनाथ नखाते Pckhabar- फेरीवाला हा पुरातन काळापासून आपली उपजिविका करत आहे. गावाची शहरे झाली या  शहरांच्या विकासाला  विरोध नाही. मात्र फेरीवाल्यांना  शहरांमध्ये सामावून घेऊन त्यांना सन्मानाने परवाने, हॉकर्स झोंन द्यावेत ते  मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असे मत  महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, कामगार नेते  काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र ...

Nigdi News : यमुनानगरमध्ये नवदुर्गा सन्मान, महिला स्वसंरक्षण मार्गदर्शन शिबिर – भाजपा युवा मोर्चा व मणिकर्णिका प्रतिष्ठानचा पुढाकार Pckhabar-समाजात आपापल्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला भगिनींचा शारदीय नवरात्रोत्सव निमित्त यमुनानगर निगडी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गिरीष देशमुख, त्यांच्या पत्नी प्रियांका देशमुख व मणिकर्णिका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित केला.  यमुनानगर परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर ...

Pimpri News :  स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे  महापालिकेत आंदोलन Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील महापौर कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले.  या आंदोलनात आंदोलकांपैकी एकाला किरीट सोमय्या यांचा मुखवटा घालण्यात आला होता. त्याच्याकडे महापालिकेतील स्मार्टसिटी गैरव्यवहाराची फाईल सोपवून पालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुखवटा घातलेल्या आंदोलकाने सोमय्या यांच्या शैलीत बोलून ...

Pimpri News :  अपूर्ण कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करा: महापौर माई ढोरे Pckhabar- आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आरोग्य व स्थापत्य विभागाने कामाचे एकत्रित नियोजन करुन दिवाळीपूर्वी अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केल्या.  आयुक्त कार्यालयात स्थापत्य व आरोग्य विषयक विकास कामांबाबत महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ...

Akurdi News: अपघात घडल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करू;  शिवसेना शहर संघटक बशीर सुतार यांचा इशारा आकुर्डीतील रस्त्याच्या दूरवस्थेकडे वेधले लक्ष Pckhabar- आकुर्डी गावात मुख्य रस्त्याचे काम चालू आहे. रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर निकृष्ट कामामुळे संपूर्ण रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या टायरमुळे खडीचे दगड उडून पायी चालणाऱ्या नागरिकांना लागत आहेत.शिवाय रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचांवरही हे दगड लागून नुकसान होत ...

Pimpri News : कवी अरूण बो-हाडे यांच्या ‘चांदण्यांच्या अंगणात’ काव्यसंग्रहाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन Pckhabar- कामगार नेता असला तरी अरुण बो-हाडे हे मुलता: कवी आहेत. त्यांच्याजवळ प्रयत्न, चिकाटी आणि उत्स्फूर्त अशी काव्यलेखन शैली आहे. सार्वजनिक क्षेत्रात दिर्घकाळ कार्यरत असताना आपल्या आजूबाजूच्या ब-यावाईट अनुभवांतूनही मनाची संवेदनशीलता टिकवून ठेवली आहे. त्यांच्या लेखनात सृष्टीविषयीचे प्रेम, माणसाविषयीची आस्था आणि श्रध्दाभावही आहे. मुल्य-हासाची ...