Chinchwad News: चिंचवडगावात  दिवाळी शॅपिंग फेस्टिवल प्रदर्शनाचे उदघाटन Pckhabar- आगामी दिवाळी सणानिमित्त मोरया यात्री निवास चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॅपिंग फेस्टिवल या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते करण्यात आले. महिलांच्या उत्पादित मालाकरिता बाजारपेठ मिळावी तसेच दिवाळी सणानिमित्त विविध साहित्य, पदार्थांची ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समर्थ एव्हेंट व सांस्कृतिक आघाडी भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी ...

Chinchwad News : नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी नुकतेच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ...

Chinchwad News : उमेदीच्या काळात मिळालेला सन्मान आयुष्य भरासाठी प्रेरणा देतो : साहित्यिक श्रीकांत चौगुले युवा गायिका नंदिनी गायकवाड पंडित रतिलाल भावसार पुरस्काराने सन्मानित Pckhabar-  “उमेदीच्या काळात मिळालेला सन्मान आयुष्यभरासाठी प्रेरणा देतो!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी नादब्रह्म, देवधर सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवड येथे काढले. नादब्रह्म परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी युवा आश्वासक गायकासाठी देण्यात येणारा पंडित रतिलाल भावसार स्मृती पुरस्कार ...

Bhosari Crime News : ऑरक्रिस्टामधील गायिकेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार Pckhabar- ऑरक्रिस्टामध्ये गायिका म्हणून करण्यास घेऊन महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणार्‍या ऑरक्रिस्टा चालकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 पासून 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला. बाळू शिवाजी गव्हाणे (वय-55, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी ...

Sangvi Crime News : मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाची फसवणूक Pckhabar- मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएमकार्डची अदलाबदल करून त्या एटीएममधून 59 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. रघुनाथ शंकर पाटील (वय-77, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात ...

Pimpri News : वडिलांचा ८६ वा वाढदिवस मातृसेवा सेवाभावी संस्थेत अन्नदान करून केला साजरा Pckhabar- लेखक, कवी, रंगकर्मी, व्याख्याते पत्रकार भरत बारी यांनी वडिल नारायण बारी यांचा ८६ वा वाढदिवस मातृसेवा सेवाभावी संस्थेत अन्नदान करून व केक कापून येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी वाढदिवस अन्नदान करून साजरा करीत संस्थेतील वृद्ध व ...

Sangvi News : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळातर्फे गरबा, भोंडला, संगित खुर्ची यासह विविध कार्यक्रम Pckhabar-नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने गरबा, भोंडला, संगित खुर्ची, ऑर्केस्ट्रा व नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमांचा आनंद घेतला. अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यामध्ये ...

Sangvi News : डॉक्टर, मराठी कलाकार व महिला शिक्षकांच्या हस्ते शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या देवीची आरती शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळातर्फे डॉक्टर व कलाकारांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष गौरव Pckhabar-जुनी सांगवीतील शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शर्मिला गायकवाड, मराठी अभिनेता सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता देशमुख आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या महिला शिक्षकांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. ...

Sangvi News : भक्ती कांबळे व ऋग्वेदा डोळस यांचा सत्कार मराठवाडा जनविकास संघ, धनंजय मुंडे युवा मंच व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन Pckhabar-मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) पिंपळे गुरव, धनंजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात हवेत पंच मारण्याच्या प्रकारांमध्ये सिल्वर मेडल मिळविलेल्या भक्ती राजेंद्र कांबळे व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी ...

Chinchwad News : संत निरंकारी शांती आणि शिस्तीचे मिशन : महापौर माई ढोरे शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान Pckhabar- संत निरंकारी मिशन हे शांतीचे आणि शिस्तीचे मिशन आहे. मिशनच्या माध्यमातून केलेले रक्तदान शिबिराचे आयोजन हा स्तुथ्य उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले. संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन झोन पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत वाल्हेकरवाडी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ...