Lonavala News: लोणावळ्यातील पर्यटन विकासाला चालना द्या ; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी Pckhabar-लोणावळा शहराला पर्यटनाचा दर्जा मिळावा व शहर व परिसरातील पर्यटन स्थळे विकसीत करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध व्हावा ह्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची लोणावळा शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली . शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या उपस्थितीत पुढील काही दिवसात संबंधित ...

Lonavala News : लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय व विविध विकासकामांचे भूमिपूजन आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण शासनाच्या प्राधान्यक्रमावर- उपमुख्यमंत्री अजित पवार Pckhabar- कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना सातत्यपूर्ण दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ...

Lonavala News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तीन ठार, सहा जखमी Pckhabar- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र व भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ...

Lonavala News : पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळ्यात आमदार शेळके यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन Pckhabar- लोणावळा-खंडाळा परिसरातील टपरीधारक, टॅक्सी,रिक्षा चालक मालक संघटना व माळी कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रशासन व काही पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळात आज ( मंगळवार) मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. लोणावळा आणि परिसरातील अनेक व्यवसाय पर्यटन,पर्यटकांवर अवलंबून आहेत. सध्या ...

Lonavala News : लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले Pckhabar-लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. हा प्रकार आज (सोमवार) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरल्याचे समजताच रेल्‍वे प्रशासनाने रेल्‍वेचे डब्‍बे रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले ...

Pune -Lonavala Local News : पुणे-लोणावळा लोकल फेऱ्यांत आजपासून वाढ Pckhabar-लोणावळा-पुणे मार्गावर सध्या चार लोकल धावत असून, या मार्गावर आणखी एक लोकल वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आज (बुधवार) पासून ही जादा लोकल सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे-लोणावळा या मार्गावर सुमारे ४० हून अधिक लोकलच्या फेऱ्या नियोजित होत्या. मात्र, गतवर्षी आलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ...

Lonavala News : लोणावळा नगरपरिषद व रेल्वे कडून नागरिकांना रेल्वे पास देण्याची सुविधा उपलब्ध Pckhabar- कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोणावळा पुणे रेल्वे प्रवास करता येणार आहे . या प्रवासासाठी आवश्यक असणारा सिझन अथवा मासिक पास स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. लोणावळा नगरपरिषदेने नागरिकांसाठी ही सुविधा रेल्वे तिकिट घराजवळच उपलब्ध करून दिली आहे . ...

Lonavala News : दोन दिवसात पर्यटकांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल Pckhabar- पर्यटनस्थळ बंदी असताना देखील नियम मोडत लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळ भागात शनिवार व रविवार निमित्त आखाड पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे . विनामास्क फिरणाऱ्या तब्बल 361 पर्यटकांकडून 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे . ...

Lonavala News : विंध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाटणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत Pckhabar- मावळात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पाटण हद्दीतील घरकुल परिसरातील अनेक घरांमध्ये राजाणा ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नागरिकांना युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विजय तिकोने यांच्या पुढाकारातून विंध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नधान्य  वाटप  करण्यात आले. पाटण येथील विजय तिकोने यांच्या कार्यालयात तसेच घरकुल ...

  Lonavala Crime News : सुप्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर लाखोंचा दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद Pckhabar- लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध  डॉ . हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर 17 जुनच्या पहाटे दरोडा टाकत 67 लाखांचा मुद्देमाल लंपास केलेल्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला यश आले आहे . पोलीस पथकाने याप्रकरणी 15 आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन बालके ताब्यात घेण्यात आली ...