Dehu News : विविध क्रीडा शर्यतीतून बालचमूंनी पालकांना दिला सकस व पोषक आहाराचा संदेश श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन  उत्साहात Pckhabar – अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी  नर्सरी ते सिनियर केजीच्या बालचमूंसाठी पोषक आहार या संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण अशा विविध क्रीडा शर्यतींचे आयोजन करीत या क्रीडा शर्यतींच्याच माध्यमातून मुलांना ...

Pimpri News : इंडिया हॉकीच्या  शिष्टमंडळाने मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची केली पाहणी Pckhabar- भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या हॉकी  स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात इंडिया हॉकीच्या दिल्ली येथील द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. महापालिकेच्या नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची पाहणी करून तेथील सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली. या शिष्टमंडळामध्ये हॉकी इंडिया चे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम सिंग, कार्यालयीन समन्वयक प्रेम किशन यांचा समावेश होता. पिंपरी ...

IPL News : चेन्नई-कोलकाता लढतीने वाजणार आयपीएलचे बिगुल पुण्यातील गहुंजे मैदानावर १५ लढती रंगणार Pckhabar- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या लोकप्रिय टी-२० क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले आहे. २६ मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील लढतीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. आयपीएलच्या १५व्या ‘ हंगामातील शेवटचा साखळी सामना २२ मे रोजी संध्याकाळी ...

Pimpri sports News : अभिमानास्पद! वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र रणजी संघात निवड Pckhabar- थेरगाव येथील महापालिकेच्या पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची रणजी स्पर्धेच्या २०२२ मोसमाकरिता महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली आहे. या खेळाडूंचे महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी अभिनंदन केले असून पुढील कारकिर्दीसाठी त्यांनाशुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना ...

U19 World Cup News : युवा टीम इंडियाने रचला इतिहास!, इंग्लंडला पराभूत करत भारताने पाचव्यांदा जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप Pckhabar- वेस्ट इंडीजमधील आँटिगाच्या मैदानात यश धूलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने इतिहास रचला आहे. बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत करत भारताने पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ...

U19 World Cup News : भारतीय संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय Pckhabar- अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये लढतीत भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करत दिमाखात फायनल गाठली आहे. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 194 धावांत आटोपला. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये 96 धावांनी विजय नोंदवला. वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत ...

Sports News: भारताच्या धाकड गर्लचा अमेरिकेमध्ये झेंडा; फ्री स्टाईल कुस्तीमध्ये रितिका काकडे प्रथम Pckhabar- बारामती तालुक्यातील निंबुत गावचे व सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये स्थायिक असणारे श्री राहुल रत्नसिंह काकडे यांची कन्या कुमारी रितिका राहुल काकडे हिने वॉशिंग्टन येथे झालेल्या 14 वर्ष वयोगटात 65 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. निंबुत येथील राहुल रत्नसिंह काकडे कामानिमित्ताने अमेरिकेतील वॉशिंग्टन ...

Sports News : विराट कोहलीचे धक्कातंत्र; कोहलीने दिला कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा Pckhabar- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही वेळापूर्वी कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. सात वर्षांच्या नेतृत्वानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कोहलीने  अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोहलीने यापूर्वीच 20-20 क्रिकेट कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक ...

IPL News : विवो नाही आता टाटा आयपीएल! Pckhabar- जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. सर्व संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच या स्पर्धेत अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेली चिनी मोबाईल कंपनी विवोने  प्रायोजकत्व मागे ...

Sports News: राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा यांचा  गौरव Pckhabar-मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त फुटबॉलपटूमधील उल्लेखनीय कामगिरीबाबत राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा यांचा पोलीस निरीक्षक ( गुन्हे) राजेंद्र  निकाळजे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी पिंपरी  चिंचवड युवा सेनेचे उप शहरअधिकारी राजेंद्र तरस, संस्थेचे संस्थापक   दशरथ शेट्टी, अध्यक्ष संतोष दुधगागरे  उपस्थित होते. शर्मा ...