
Maval News : गरजू कुटुंबियांना थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर्स आणि ब्लँकेटचे वाटप
Pckhabar- महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड , लोणावळा गिल्डतर्फे श्रीमती, शां. गो . गुप्ता विद्यालय मळवली (भाजे) येथे गरजू कुटुंबियांना थंडीपासून संरक्षणार्थ स्वेटर्स आणि ब्लँकेटस वाटप करण्यात आले.
यावेळी राज्य सचिव डॉ . अमोल कालेकर, लोणावळा गिल्ड सचिव सुनिल शिंदे, उपाध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, हेमलता शर्मा, नितु पुजारी, सायली जोशी, राजश्री कांबळे, प्रशांत घाडगे, जगन्नाथ दोरकर, हणुमंत इंगवले, शिक्षक बाळू शिरसाठ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
गिल्ड सदस्य व स्काऊट शिक्षक मनोहर भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सर्व स्काऊट गाईड सदस्य, प्राचार्या क्षिरसागर मॅडम मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. सुनिल शिंदे यांनी आभार मानले.











Leave a Reply