Talegaon Dabhade News : तळेगावात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

Talegaon Dabhade News : तळेगावात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Pckhabar- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे दि. 9 (गुरुवार) ते दि. 15 (बुधवार) एप्रिल या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे आयाेजन करण्यात आले आहे. यानिमित्त स्वामींचा अभिषेक, पूजा, भुपाळी आरती, नैवेद्य आरती, विशेष याग, औदुंबर प्रदक्षिणा, सामुदायिक गुरूचरित्र वाचन, विविध याग यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे, समर्थनगर, डी.पी. राेड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमाेर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हाेणार आहे. या सप्ताह काळात दरराेज सकाळी 7 वाजता स्वामींचा अभिषेक व पूजा, 8 वाजता भुपाळी आरती, 10.30 वाजता नैवेद्य आरती, 10.30 ते 12.30 या कालावधीत विशेष याग, त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 5.30 वाजता स्वामी चरित्र आणि दुर्ग सप्तशती वाचन ग्राम अभियान अंतर्गत 18 विभागाचे मार्गदर्शन, सायंकाळी

5.30 ते 6 वाजेपर्यंत औदुंबर प्रदक्षिणा, 6 वाजता नैवेद्य आरती, पावणेसात वाजता नित्यध्यान, गीतेचा 15 वा अध्याय आणि विष्णुसहस्त्रनाम वाचन असे कार्यक्रम हाेणार आहेत. त्याचबराेबर सामुदायिक गुरुचरित्र वाचन सकाळी 5.30 ते 7.30 एक बॅच आणि सकाळी 8.15 ते 10.30 दुसरी बॅच हाेणार आहे.

या सप्ताह कालावधीत ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग,  मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, श्री गीताई याग, श्री रुद्र याग, मल्हारी याग, बलि पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन असे विविध याग हाेणार आहेत.

या सप्ताह काळात ग्रामअभियाना अंतर्गत वैयक्तिक, सामाजिक अडचणी पितृदोष, कुलदेवतादोष, वास्तुदोष, ग्रहपीडा, नोकरी, व्यापार उद्योग, व्यसन, शिक्षण, शेती, आरोग्य, विवाह यासारख्या समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

सामुदायिक गुरुचरित्र पारायण नोंदणीसाठी संपर्क – 8087592179, 8007631768, 9890190671,9860305233 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्वामी सेवेक-यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *