Talegaon Dabhade News : ‘KOOL KIDZ SCHOOL’ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Talegaon Dabhade News : ‘KOOL KIDZ SCHOOL’ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Pckhabar- तळेगाव दाभाडे, मोहन नगर येथील ‘KOOL KIDZ SCHOOL’ मध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

वनश्री नगरमधील श्रीरंग कला निकेतन येथे झालेल्या
स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे अनिल वेदपाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी
शाळेच्या शिक्षिका सौ. ज्योती जमदाडे आणि सौ. मोनाली कोठावदे, संदिप जमदाडे, सचिन कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनात प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी वर्गाच्या मुलांनी अतिशय सुंदर असे नृत्य केले. सिनियर केजीमधील मुलांनी गणेश वंदना सादर केली. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी ‘नन्हा मुन्हा, राही है’ देश भक्तीपर गीतावर नृत्य केले. तसेच प्लेग्रुप, नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी ‘बम बम बोले’ या गीतांवर नृत्य सादर केले. लहान मुलांच्या गोंडस नृत्याने सर्वांची मने जिंकली.

शाळेच्या शिक्षिका सौ. ज्योती संदिप जमदाडे आणि सौ. मोनाली सचिन कोठावदे यांनी मुलांना नृत्य शिकविले. तसेच पालकांनी विविध वेशभूषा करून स्नेहसंमेलनात सहभाग नोंदविला.

दरम्यान, शैक्षणिक वर्षात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे अनिल वेदपाठक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदिप जमदाडे व सचिन कोठावदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *