Dehu News : शिष्यवृत्ती परीक्षेत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे घवघवीत यश
Pckhabar- महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या इ. चौथी व सातवीच्या गुणवत्ता यादीत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहूच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Oplus_131072
इ.चौथीतील निंबाळकर वेदांत लक्ष्मण आणि इ. सातवीतील माने अथर्व प्रशांत यांनी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, जिद्द आणि अभ्यासातील चिकाटी, तसेच पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन व प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.
“मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात,” असा संदेश देत सृजनदीप फाऊंडेशनचे सचिव शाळेचे प्रा. विकास कंद यानी या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.








Leave a Reply