Pune District News : अश्विनी कोळेकर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार

Pune District News : अश्विनी कोळेकर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार
यूपीएससी परीक्षेत 675 वा क्रमांक
Pckhabar-  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी ) नागरी सेवा परीक्षेत 675 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अश्विनी अरुण कोळेकर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुण्यातील गणेश कला, क्रिडा मंच येथे सत्कार करण्यात आला.

अश्विनी कोळेकर यांनी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविले. त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) किंवा भारतीय महसूल सेवा (आयआरएस) मिळण्याची शक्यता आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनातही अश्विनी यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत अनेक पदके, ट्रॉफी आणि सन्मान मिळविले आहेत.

अश्विनी कोळेकर यांना सत्कारप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत समाजसेवेचे ध्येय कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *