Talegaon Dabhade News : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त उत्सव, पालखी साेहळ्याचे आयाेजन 

Talegaon Dabhade News : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त उत्सव, पालखी साेहळ्याचे आयाेजन

Pckhabar श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे येत्या शुक्रवारी (दि.20) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे, इंद्रायणी काॅलनी येथील सप्तशृंगी माता मंदिरात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडाेरी प्रणित) श्री स्वामी समर्थ महाराज जयंती उत्सव, पालखी साेहळा आणि महाप्रसाद हाेणार आहे. यानिमित्त शुक्रवारी दुपारी तीन वाजता श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन, पावणेचार ते पाच वाजेपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन, हवन हाेणार आहे.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सप्तशृंगी माता मंदिरापासून श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी साेहळा आनंदनगर, मनाेहर नगर, वनश्रीनगर, स्वामी समर्थ मंदिर, सिम्काे काॅलनी, माेहननगर आणि परत सप्तशृंगी माता असा हाेणार आहे. रात्री साडेआठ वाजता आरती आणि महाप्रसाद हाेणार आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश माेहनराव काकडे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *