Pune news : अपक्ष उमेदवार प्रा. संतोष फाजगे यांना शिक्षक मतदारांचा उदंड प्रतिसाद

 

Pune news : अपक्ष उमेदवार प्रा. संतोष फाजगे यांना शिक्षक मतदारांचा उदंड प्रतिसाद
Pckhabar- विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. संतोष फाजगे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मतदारांच्या भेटी-गाठी घेत आहेत. आजपर्यंत शिक्षकांचे मार्गी लावलेले प्रश्न आणि भविष्यात शिक्षकांसाठीचे करणार असल्याचे काम फाजगे प्रचारात सांगत आहेत. त्यामुळे त्यांना पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. केलेल्या कामांची शिक्षक पावती देतील, असा विश्वास फाजगे यांनी व्यक्त केला आहे.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांच्या समावेश येत असलेल्या शिक्षक मतदारसंघातून प्रा. संतोष फाजगे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिक्षक मतदारसंघात एकूण 71 हजार 973 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 32 हजार 201 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. फाजगे पिंपळेगुरव येथील रहिवाशी आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये गेली 30 वर्षे त्यांनी अध्ययपनाचे कार्य केले आहे.

फाजगे राज्य महासंघाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. 2010 पासून शिक्षक संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. संघटनेच्या माध्यमातून ते शिक्षकांसाठी काम करतात. शिक्षकांच्या अन्यावर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुण आक्रमकपणे आवाज उठवितात. अनेक आंदोलन यशस्वी केली. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा प्रा. फाजगे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकांचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी संघटीत शक्तीचा सामुहिक प्रयत्नांची व त्याला बळ देण्यासाठी विधीमंडळात चळवळीतील शिक्षकाला प्रतिनिधी म्हणून निवडण्याची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील शिक्षक पसंती क्रमांक एकचे मत देवून केलेल्या कामाची पावती देतील. विधानपरिषदेत शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची संधी देतील,  असा विश्वास प्रा. फाजगे यांनी व्यक्त केला आहे.   फाजगे यांनी पुणे जिल्ह्यात प्रचारात धडाका केला आहे. शिक्षकांचे मेळावे, भेटी-गाठी घेत प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यातील शिक्षकांचा फाजगे यांना भरघोस पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून प्रा. फाजगे यांनी शिक्षकांचे मार्गी लावलेले प्रश्न!

मोर्च, धरणे, जेलभरो, बहिष्कार यासह राज्यव्यापी 19 दिवस व 42 दिवसांचा संप एकसंघपणे करणारी लढाऊ संघटना म्हणून शिक्षक संघटनेची ओळख आहे. गेली 40 वर्ष संघटना संघर्षरत आहे. पाच ते सहा वर्षात केलेली आंदोलने, त्यामुळे व्यक्तिगत व स्थानिक प्रश्नांशिवाय शिक्षण आणि शिक्षकांच्या लाभाचे धोरणात्मक शासन आदेश, परिपत्रके आंदोलनातून मिळविली आहेत. त्यात वेतनेत्तर अनुदान सुरु झाले. डीएचई पदवी सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरणे व पदोन्नतीस पात्रतेचा आदेश, शिक्षण सेविकांना सहा महिने प्रसुती रजा कार्यसेवा म्हणून ग्राह्य धरणे, शिक्षणसेवक पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा आदेश, वैद्यकीय बील मंजुरीबाबत कमाल मर्यादेत वाढ करुन मंजुरीच्या अधिकारामध्ये सुधारणा, रात्रशाळा शिक्षकांच्या आस्थापना मान्य करणारा आदेश, व्यवसाय शिक्षणातील शिक्षकांना 1 जानेवारी 1996 च्या वेतनश्रेणीचा लाभ देणारा आदेश, संपकालीन 42 दिवसांच्या रजा खात्याला जमा करणे, अभ्यासगट रद्द करण्याबाबतचे आदेश सरकारकडून आंदोलनाच्या माध्यमातून फाजगे यांनी काढून आणले आहेत.

आगामी काळातील निजोजित कामे
बेकायदेशीर पेन्शन योजना रद्द करुन सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणसेवक योजना रद्द करणे, घोषित व अघोषित शाळांचे मुल्यमापन करणे, सहाव्या व सातव्या वेतन आयोगामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या वेतनश्रेणीत झालेला अन्याय दूर करणे, विद्यार्थी पटसंख्येच्या निकषांमध्ये बदल करणे, विनाअनुदानित शिक्षकांना टप्पा अनुदानाऐवजी नियुक्ती दिनांकापासून 100 टक्के वेतन सुरु करणे, शाळांना पाच दिवसाचा आठवडा करणे, शारिरीक, कला, संगीत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचा संकल्प संतोष फाजगे यांनी सोडला आहे.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)