Maharashtra news : ‘जनतेशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी गमावला’: आमदार भालके यांना मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली

Maharashtra news : ‘जनतेशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी गमावला’: आमदार भालके यांना मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली
Pckhabar-आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे जनतेशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी गमावला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना भालके यांनी या परिसराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भालके यांना श्रध्दांजली वाहिली.

सोलापूर जिल्ह्यातील राजकारण- समाजकारणासह राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांत पुढाकार घेणारा लोकाभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. आमदार भालके यांच्या निधनामुळे विधीमंडळातील एक बाणेदार सहकारी गमावला आहे.

भालके कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला आहे, त्यांना तो सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *