Talegaon Dabhade News : श्री गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

Talegaon Dabhade News : श्री गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा
यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
Pckhabar- श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील यशवंत नगरमध्ये यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

यशवंत नगरमध्ये यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने (रविवारी) सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी 9 वाजता श्रींची पुजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती झाली. सायंकाळी
सहा वाजता किर्तनकार : ह.भ.प. सोमनाथ महाराज भालेराव यांचे किर्तन संपन्न झाले. कीर्तनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्रीची महाआरती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गणेश काकडे, माजी नगरसेवक, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निखिल भगत यांच्या हस्ते करण्यात आली.

दरम्यान, दुपारी आणि रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे एक हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन यशवंत प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी केले.