देहूरोड येथील सायलीचे बॉटल आर्ट वर्क, रांगोळीतील बाप्पा

देहूरोड येथील सायलीचे बॉटल आर्ट वर्क, रांगोळीतील बाप्पा

Pckhabar: टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केला जातात. पण, देहूरोड येथील सायली खेडकर हिने त्याला कलेची, वर्क आर्टची जोड दिली आहे. अतिशय सुरेख असे बॉटल वर्क केले आहे. त्यावर गणपती बाप्पाची पेंटिंग काढली आहे. रांगोळीत काढलेला गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

देहूरोड, किवळे येथे आई-वडिलांसह सायली वास्तव्यास आहे. आर्ट वर्कची तिला आवड आहे. अनेक टाकाऊ वस्तूचा योग्य वापर करत तिने अतिशय सुंदर अशी कलाकुसर केली आहे. सायली वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल आर्ट, होम डोकेरेशन करते. कुंड्यावर चित्र काढते. अतिशय सुंदर रांगोळी आर्ट करते. देखावा सूंदर करते. तिच्या या कलेचे परिसर, महाविद्यालयात कौतुक केले जात आहे.

सायली हे आर्ट बनवितानाचा व्हिडीओ तयार करते. तो व्हिडीओ युट्युब, इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या या कलेला हजारो लाईक्स येतात. टाकाऊ वस्तू पासून काहीतरी कलात्मक करण्याची मला आवड आहे. अनेक वर्षांपासून मी टाकाऊ वस्तूपासून आर्ट वर्क करत आहे. त्याचा मला छंद आहे. माझ्या या कलेचे अनेकांकडून कौतुक केले जाते. त्यामुळे आणखी वेगळी कला करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते. नाविन्यपूर्ण आर्ट वर्क करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो असे सायली खेडकरने ‘पीसी खबर’शी बोलताना सांगितले.