Pimpri news: ‘कोरोना लसीकरण आपल्या दारी’ हे राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवा Pckhabar- कोरोना कोविड -19 च्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहूल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण लवकरात लवकर व्हावे हे देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. अठरा वर्षापुढील प्रत्येक व्यक्तींचे ...

Mumbai News : नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र शोकमग्न आहे;  मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत Pckhabar-“ कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी ...

Pimpri news: कोरोना प्रतिबंधक लसीचे 4 हजार 810 डोस वाया गेले Pckhabar- कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लसीचे 4 हजार 810 डोस नासवले आहेत. ‘कोव्हिशील्ड’चे 3 हजार 100 आणि ‘कोव्हॅक्सिन’चे 1 हजार 710 डोस वाया गेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेची आणि खासगी अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. महापालिकेला ...

Maharashtra News : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता Pckhabar- राज्यात कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे गरजेचा आहे. आज मंगळवार झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी लाॅकडाऊन लावण्यास समर्थन केले आहे. त्यामुळेच राज्यात  15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

Maharashtra News: रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना Pckhabar-महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच ...

Pckhabar-सांगवी परिसरात जेसीबी व इतर यंत्राद्वारे सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या गेल्या वर्षभरात तब्बल 405 ठिकाणी तोडण्यात आल्यामुळे वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गंभीर बाब म्हणजे दि. 26 मार्चला महावितरणची उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी खोदकामात तोडल्यामुळे महापारेषणच्या रहाटणी ...

Maval news: गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर उपाययोजना करा कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या भागावर अधिक  लक्ष केंद्रित करा Pckhabar– मावळ तालुक्यात दिवसेंदिवस  कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलपेक्षा घरी उपचार घेणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे. ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.  गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर ...

Bhosari news: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची समस्या तीन दिवसांत संपेल! – महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांची भूमिका – आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित अधिकारी-डॉक्टरांची बैठक Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी शासनस्तरावर व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्‍न तीन दिवसांत संपेल, अशी भूमिका महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी मांडली. ...

Maval news: ‘जेएनपीटीने’ कोरोना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, रेमिडिसेवीर, मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे – श्रीरंग बारणे Pckhabar- जेएनपीटीने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव आहे. जेएनपीटी प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना आवश्यक असलेले रेमिडिसेवीर इंजेक्शन उपलब्ध करावे. डॉक्टरसह इतर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ...

Pimpri crime news: कोरोना निगेटिव्हचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश Pckhabar- प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे.  हा प्रकार सोमवारी  दुपारी इंदिरा कॉलेज जवळ वाकड येथे उघडकीस आला. पत्ताराम केसारामजी देवासी (वय 33, रा. भुमकर वस्ती, वाकड), राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय 25, रा. धनकवडी, पुणे), चिरंजीव (पुर्ण ...