Chinchwad News : सरोवर प्रतिष्ठाणच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी 

Chinchwad News : सरोवर प्रतिष्ठाणच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी

Pckhabar – वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौकात सरोवर प्रतिष्ठाणच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश मस्के, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, शुभम वाल्हेकर, माजी नगरसेवक अमित गावडे, निलेश वाल्हेकर, संजय नलावडे, प्रशांत हादगे, कमलजीत सिंग, कुणाल भरं, प्रसाद बाविस्कर, शरद मांढरे, अक्षय गायकवाड, गौरव गोळे, अमोल निकम, राजा भगत, सौरभ वाघमारे, आकाश धपाटे, सोहेल शेख, आनंद झेंडे, रोहित पवार, कृष्णा गंगणे, सतीश राठोड आदी उपस्थित होते.
फुलांचा वर्षाव आणि ‘प्रभू श्री रामचंद्र की जय’ म्हणत जन्मोत्सव पार पडला. यावेळी रामभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सगळीकडे राम लल्लांचा जयघोष घुमत होता. रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजवलेल्या मंदिरामध्ये श्रीरामाचा जयघोष झाला अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… प्रभू रामचंद्र भगवान की जय’… अशा जयघोषाने श्रीराम मंदिराचा परिसर दुमदुमदून गेला. भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले होते. सुंटवड्याचा प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता केली. जन्मोत्सवावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.