Chinchwad News: पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेलच्या वतीने बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

Chinchwad News: पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेलच्या वतीने बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन
Pckhabar-महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेल, आदिम महिला महासंघ, आदिवासी समन्वय समिति, राजगृह लोकोत्तर बुध्दीष्ट धम्म विनय ट्रस्ट यांच्यावतीने बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपळे गुरव येथील सह्याद्री आदिवासी प्रबोधन संस्थेच्या भालचिम सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेलचे शहराध्यक्ष विष्णू शेळके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नम्रता शिंदे होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, महापालिकेचे समूह संघटक अमोल कावळे, समूह संघटिका वैशाली खरात, विजया बांबळे, महासंघाच्या 46 गटाच्या प्रतिनिधी, चिंचवड महिलाध्यक्षा ललिता वाजे, अनुसूचित जमाती सेलच्या महिला शहराध्यक्षा सुशिला जोशी, महिला सरचिटणीस सुनिता कोळप, उज्ज्वला कोरके, सुनिता ठोंगिरे, आशा धुमाळ, शैला बुरुड, दीपा कानगुडे, कमल गायकवाड, सत्यभामा भवारी, कमल दाते, जिजा शिंगाडे, सविता मुंढे आदी उपस्थित होते.
अमोल कावळे यांनी महिलांना महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दिव्यांगाना रोजगारासाठी अर्थसाहाय्य याबद्दल माहिती दिली, तर वैशाली खरात यांनी बचत गट निर्मितीची पद्धत, फायदे आणि अनुदान याबाबत माहिती दिली. विजया बांबळे यांनी महिलांच्या उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विवीध कर्ज योजना, सबसिडी याबाबत मार्गदर्शन केले.
विष्णू शेळके यांनी उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांच्या माध्यमातून आठवडे बाजार आणि एक गट – एक व्यवसाय संकल्पना मांडली. अध्यक्षस्थानावरून नम्रता शिंदे यांनी महासंघाच्या कामकाजाचे आणि त्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध विधायक उपक्रमांचे कौतुक करीत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी कायम प्रोत्साहन राहील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी, सूत्रसंचालन सविता मुंढे यांनी, तर आभार सुशिला जोशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *