Sad News : टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास टिळेकर यांचे निधन

Sad News : टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास टिळेकर यांचे निधन

Pckhabar- टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास हरिभाऊ टिळेकर यांचे रविवारी (दि.20) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते.

टिळेकर हे पुणे जिल्ह्यातील सासवड, दिवेगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिळेकर यांच्या पार्थिवावर सोमवारी (21) सकाळी सासवड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.