Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन

Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शुक्रवार, दि. १५ डिसेंबर, २०२३ ते रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत सृजनदीप व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जीवन चरित्राचा वेध घेणारी शिवमय व्याख्यानमाला यावर्षी संपन्न होत आहे.

शिवचरित्रातील तेजस्वी विचारातून तेजोमय पिढी घडावी… याच विचारातून या व्याख्यानमालेत तीनही दिवस शिवचरित्रावर आधारित अशा विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. शुक्रवार, दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी या व्याख्यानमालेचे उद्घाटन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरूषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होणार आहे. या प्रथम दिवशी लेखक, विचारवंत प्रा. गणेश शिंदे हे ‘राजमाता जिजाऊ मासाहेब – संस्कारपीठ’ या विषयावर व्याख्यान देणार असून अध्यक्षस्थानी देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. निवेदिता घार्गे असणार आहेत.

शनिवार, दि. १६ डिसेंबर रोजी ‘जाणता राजा – छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवनिश्चल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी व्याख्यान देणार असून इतिहास संशोधक, लेखक श्री. संदीप तापकीर हे अध्यक्षस्थानी असतील. रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे अभ्यासक मा. निलेश गावडे हे ‘गड किल्ले – महाराष्ट्राचे वैभव’ या विषयातून चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर व सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी दिली.