Crime News : घराला भगदाड पाडून चोरट्यांनी भरलेला गॅस सिलेंडर नेला चोरून

Crime News : घराला भगदाड पाडून चोरट्यांनी भरलेला गॅस सिलेंडर नेला चोरून


Pckhabar- वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त असून चोरटे डिझेल, पेट्रोलसह आता गॅस सिलेंडरवरही डल्ला मारत आहेत. बंद घरात जमिनीमध्ये भगदाड पाडून अज्ञात चोरट्याने घरातील एलईडी टीव्ही, भरलेला गॅस सिलेंडर असा 18 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चाकण येथील ग्रामीण रूग्णालय परिसरातील शासकीय इमारतीमध्ये नुकतीच घडली.

वसंत नामदेव झगडे (वय-50, रा. शासकीय निवास्थान, ग्रामीण रूग्णालय, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांचे घर दि. 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते.

चोरट्यांनी घराच्या लाकडी दरवाज्याच्या खालील बाजूला भगदाड पाडून घरात प्रवेश केला. घरातील हायर कंपनीचा 17 हजारांची एलईडी टीव्ही, 1200 रूपयांचा भारत गॅस कंपनीचा भरलेला सिलेंडर असा 18 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *