Pimpri Crime News : ‘मी इथला भाई आहे, धंद्दा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागेल’ म्हणणारा भाई जेरबंद

Pckhabar- ’कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, धंद्दा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ असे म्हणत शिवीगाळ करून दहशत पसरविणार्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास महेशनगर येथील नवीन चौपाटी येथे केली.
दिपक उर्फ दिप्या सुरेश मोहिते (वय-30, रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी, नेहरूननगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय हरिदास जानराव (वय-33) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते हा गुरूवारी रात्री महेशनगर येथील नवीन चोपाटीवर गेला होता. तेथे त्याने एक लोखंडी कोयता हातात घेऊन व्यावसायिकांना ’मी इथला भाई आहे, धंद्दा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ असे म्हणत शिवीगाळ करून दहशत पसरविली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
















Leave a Reply