Wakad Crime News : शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरूणाचा खून

Pckhabar- शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाने तरूणाच्या डोक्यात लोखंडी अॅगलने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता वाकड येथील वर्व रेसिडेन्सी समोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गुरूनाथ सुतार (वय-23. रा. वाकड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार दत्ता पटेकर (वय-23, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवाथ याने आरोपी दत्ताला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने शनिवारी रात्री त्याला गाठून त्याच्या डोक्यात लोखंडी अॅगलने वार करून त्याचा खून केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.










Leave a Reply