Wakad Crime News : अॅडवान्स पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला लावली आग
तीन लाखांचे नुकसान, कामगाराला अटक

Pckhabar- अॅडवान्स पैसे दिले नाहीत म्हणून एका कामगाराने मालकाला शिवीगाळ करत दुकान आतून बंद करून तीन लाख रूपयांच्या साहित्याला आग लावून नुकसान केले. ही घटना थेरगाव येथे गुरूवारी दुपारी घडली.
प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. बिदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण सोनवणे (वय-51, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचे थेरगावात ओम साई कुशन वर्क नावाने दुकान आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या दुकानात कामाला आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडे अॅडवान्स पैसे मागितले होते. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने दुकान आतून बंद केले. फिर्यादी यांना शिवीगाळ करत ’तु मला पैसे दिले नाहीत, ना बघ आता मी काय करतो’ असे म्हणून दुकानातील फोम बनविण्याच्या साहित्याला आग लावली. यामध्ये फिर्यादी यांचे सुमारे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारील दुकानाचेही नुकसान झाले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply