Sangvi Crime News : सांगवीत दिवसाढवळ्या 14 लाखांची घरफोडी

Pckhabar- बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील तीन लाखांची रोख रक्कम, 330 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 14 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे बुधवारी दुपारी सव्वा दोन ते साडेतीन दरम्यान घडली.

कैलास चिधु सोनवणे (वय-61, रा. सोना अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी दुपारी सव्वा दोन ते साडेतीन दरम्यान बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी तीन लाखांची रोख रक्कम, 330 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 14 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार वरूडे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply