Sangvi Crime News : ठेकेदाराला खंडणी मागणार्या एकाला अटक

Pckhabar- रस्त्याचे काम करणार्या एका ठेकेदाराच्या कामगाराला काम करायचे असेल तर मला दररोज दोन हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा काम बंद पाडील, अशी दमदाटी करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे-गुरव येथे रविवारी दुपारी घडला.
मोसिम बाबु सय्यद (वय-27, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून डेव्हीड जगताप (वय-35, रा. सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम संजय चिपडे-पाटील (वय-21, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आंबिका कन्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आहेत. या कंपनीच्या वतीने पिंपळे गुरव येथे रस्त्याचे काम सुरू आहे. रविवारी दुपारी काम सुरू असताना आरोपी दुचाकीवरून आले. फिर्यादी यांना त्यांच्या मालकाला फोन करण्यास सांगून मालकाला शिवीगाळ करत मला दररोज दोन हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा मी लोकांना बोलवून काम बंद पाडील, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना एटीएमकडे ओढले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply