Chinchwad News : बांधकाम साईटवर काम करताना कामगाराचा मृत्यू; सुपरवायझरवर गुन्हा दाखल

Chinchwad News : बांधकाम साईटवर काम करताना कामगाराचा मृत्यू; सुपरवायझरवर गुन्हा दाखल

Pckhabar- बांधकाम साईटवर काम करत असताना एका कामगाराचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. कामगाराला सुरक्षितेची कोणतीच साधने न दिल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार
पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील जी. के. कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवर 26 डिसेंबर 2021 रोजी घडला.

राजु उर्फ पितल पंकज चक्रवर्ती (वय-25, रा. राज्य पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद साळवे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार राजू चक्रवर्ती हा पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील जी. के. कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवरील पहिल्या मजल्यावर काम करत होता.
कन्स्ट्रक्शन साईटवरील मुख्य बिल्डर्स व लेबर याचे कामकाज पाहणारे सुपरवायझर यांनी बांधकाम साईटवर सुरक्षितेचे कोणतेही साधन न पुरविता निष्काळजीपणा केला. कामगार राजू हे पहिल्या मजल्यावरून खाली पडले. यामध्ये राजू यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

फौजदार रुपनर अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *