
Pimpri Crime News : लग्नाच्या अमिषाने एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने महिलेसोबत ठेवले लैंगिक संबंध
Pckhabar- महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने वेळोवेळी महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले. महिलेने कुठेही तक्रार करू नये म्हणून महिलेला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पिंपरी, गोवा, तिरूपती बालाजी येथे घडला.

याप्रकरणी 51 आणि 62, वर्षीय आरोपींवर गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेन पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आश्वासन दिले. महिलेला पिंपरी, देहूरोड, गोवा आणि तिरुपती बालाजी येथे नेऊन तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. महिलेकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपीने एचआयव्ही सारखा आजार असताना त्याने ही बाब महिलेपासून लपवून ठेऊन तिच्या जीवितास धोका निर्माण करून तिची फसवणूक केली. दुसऱ्या आरोपीने पीडित महिलेने कुठेही तक्रार करू नये यासाठी तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) रूपाली बोबडे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply