Nigdi crime news : बहिण भावाला रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेआठ लाखाला गंडविले

Nigdi crime news : बहिण भावाला रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेआठ लाखाला गंडविले


Pckhabar-एका तरूणीने मी रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरीला असून एका महिलेला व तिच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखवून साडेसाठ लाख रूपये घेतले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली. ही घटना निगडी येथे उघडकीस आली आहे.

संजीवनी निलेश पाटणे (वय-25, रा. जी. के. रोझ अस्टर, सी. 905, पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमित्रा सुशिल हुले (वय-32, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आकुर्डीत एंजल ब्युटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये आरोपी महिला संजीवनी पार्लरसाठी येत होती. तिने फिर्यादी यांना मी रेल्वेमध्ये टीसी असल्याचे सांगितले. फिर्यादी व त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखविले.  यासाठी फिर्यादी यांच्याकडून 8 लाख 50 हजार रूपये घेतले. मात्र, नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *