Hinjewadi Crime News: लग्न समारंभातून सव्वा दोन लाखांचे दागिने असलेली पर्स चोरीला

Hinjewadi Crime News: लग्न समारंभातून सव्वा दोन लाखांचे दागिने असलेली पर्स चोरीला


Pckhabar-नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेलेल्या महिलेची सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 2 लाख 22 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे 7 डिसेंबर रोजी घडली.

श्रीमती सिमा हंबीरराव आडनाईक (वय-40, रा. सहकारनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या नातेवाईकांचे बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे 7 डिसेंबर रोजी लग्न होते. या लग्नाला फिर्यादी या गेल्या होत्या.  लग्न समारंभ सुरू असताना अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 2 लाख 22 हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.