Pimpri news: … त्यामुळे घरफोडी करणाऱ्या आरोपींना जामीन त्वरित मिळतो: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

Pimpri news: … त्यामुळे घरफोडी करणाऱ्या आरोपींना जामीन त्वरित मिळतो: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात घरफोडी, वाहन चोरीच्या घटना घडत आहे. यावर पोलिसांनी काही प्रमाणात नियंत्रण आणले आहे. मात्र, घरफोडीच्या गुन्ह्याला न्यायालय गंभीर गुन्हा मानत नाही. त्यामुळे वाहन चोरी, घरफोडी मधील आरोपींना लगेच जामीन मंजूर होतो, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले.

शहरात वाढत्या वाहन चोरी आणि घरफोडी च्या गुन्ह्यासंदर्भात आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते बोलत होते.

भोसरीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीतील दोन सख्खा भावांना पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आरोपी एखादे चारचाकी वाहन चोरायचे ते सार्वजनिक पार्कीगमध्ये अथवा झाडाझुडपांमध्ये पार्क करायचे. काही दिवसानंतर एखादी दुचाकी चोरायची आणि पार्क केलेल्या वाहनापर्यंत जायचे. तिथे दुचाकी लावून चोरीचे चारचाकी वाहन घेऊन दरोडा अथवा घरफोडी करायची, अशी आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत
आहे.

आरोपी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून टोळीने चो-या करायचे. घरफोडीच्या गुन्ह्याला न्यायालय गंभीर गुन्हा मानत नाही. त्यामुळे या
आरोपींना लगेच जामीन मंजूर होतो. जामिनावर बाहेर आल्यानंतर हे आरोपी
पुन्हा चो-या करतात. ज्या पोलीस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात गुन्हे
दाखल आहेत, त्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करावी. याबाबत
सर्व पोलिसांना सूचना देणार आहे. तसेच अशा गुन्ह्यातील तडीपार आरोपींनी
पुन्हा चो-या करू नयेत, यासाठी एस ट्रॅकर हे अ‍ॅप विकसित करण्यात येणार
आहे. आरोपीला व्हॉटसअपवर दररोज लोकेशन पाठविणे बंधनकारक करणार असून लोकेशन बदलल्यास कारवाहई केली जाणार असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.