Bhosari crime news : पिस्तूल जमा न करणार्‍या माजी नगरसेवकाच्या पत्नीवर गुन्हा

 

Bhosari crime news : पिस्तूल जमा न करणार्‍या माजी नगरसेवकाच्या पत्नीवर गुन्हा
Pckhabar- माजी नगरसेवक पतीच्या निधनानंतरही परवाना असलेले पिस्तूल जमा न केल्यामुळे नर्स असलेल्या पत्नीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

चारू नरसिंहा शिंदे (वय-52, रा. शिंदे बंगला, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पुजा शिवाजी कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चारू शिंदे यांचे पती नरसिंहा आर शिंदे पिंपरी नगरपालिका असताना कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर ते पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे 2014 मध्ये निधन झाले आहे.  

याबाबत पोलीस उपनिरीक्षक गाढवे यांनी माहिती दिली. आरोपी चारू शिंदे यांचे पती नरसिंहा आर शिंदे यांच्याकडे लायसन्स क्रमांक 02238 हे परवाना असलेले पिस्तूल होते. त्यांच्या पतीचे फेब्रुवारी 2014 मध्ये निधन झाले. पतीचे  निधन झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी परवाना धारक पिस्तूल पोलीस ठाण्यात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे बंधनकारक होते. मात्र, असा नियम  असताना आरोपी चारू शिंदे यांनी 1 पिस्तूल आणि 25 जिवंत राऊंड असा 30 हजार रूपयांचा ऐवज स्वतः कडे ठेवला.  पिस्तूल बेकायदेशीररित्या विना परवाना बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)