Article: एम जे एफ लायन अशोक येवले, लायन उषा येवले यांचे कौशल्य विकास प्रकल्प माध्यमातून भरीव योगदान !

Article: एम जे एफ लायन अशोक येवले, लायन उषा येवले यांचे कौशल्य विकास प्रकल्प माध्यमातून भरीव योगदान !

Pckhabar- लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत  वर्ष 2019-20 मध्ये लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे एम जे एफ लायन अशोक व लायन उषा येवले यांनी प्रेरणा कौशल्य विकास संस्थेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील शाळा, आदिवासी-वनवासी आश्रम शाळा, रात्रप्रशाळा, आय टी आय व डिप्लोमा कॉलेजेस आदी माध्यमातून कौशल्य विकास उपक्रम राबवून भरीव योगदान दिले. येवले दाम्पत्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाचे क्लबच्या सदस्यांनी वेळोवेळी कौतुक केले.

कौशल्य म्हणजे चांगले करण्याची पात्रता. ही पात्रता अंगी येण्यासाठी शिकणे  (Learning ), शिकलेले आत्मसात करणे (Understanding ), सराव (Practice) आणि कसोटी (Test ) या चार टप्पातून जावे लागते.  शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यातील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने क्रमिक अभ्यासाव्यतिरिक्त इतर विविध विषयांची तोंड ओळख विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य  अभिजात नसते. ते विकसित करावे लागते, हे धोरण दृष्टीसमोर ठेवून 2018 मध्ये एम जे एफ लायन अशोक येवले व  लायन उषा येवले यांनी प्रेरणा स्कील डेव्हलपमेंट संस्थेची स्थापना केली.

या संस्थेच्या कार्याबाबत बोलताना
एम जे एफ लायन अशोक येवले म्हणाले,  महिन्याभरात 25 वेगवेगळ्या विषयांचे समविचारी तज्ज्ञ एकत्र आले. यात इंजिनीअर, शिक्षक, CA, टेकनिशियन यांचा समावेश आहे. दोन महिने आधी संस्थेच्या  पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मुलांना योग्य असे विषय निवडून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. 20 मुलांच्या गटास एक मार्गदर्शक 5 तास त्या विषयावर विद्यार्थ्यांना practical सह माहिती सांगतो व प्रॅक्टिकल्सही करवून घेतो.

यामध्ये घड्याळ्याच्या माध्यमातून भूमिती, सायकलच्या माध्यमातून वर्तुळ (अशोक येवले ), इंग्रजी speaking (सुनीता मधुरे ), घरगुती व इंडस्ट्रियल वायरिंग व plumbing (हरण पाटील, सुरेश काळभोर ), कार व मोटरसायकलच्या पार्टस चे कार्य व रिपेरिंग, ट्रॅफिक rules (नितीन कराबले, सुजीत पटेल, दीपेश गोफणे, सागर लोंढे ), कॉम्पुटरची रचना व software operation (अशोक म्हस्के, मंदार नाटेकर, गणेशकोरे ), workshop मशीन्स व tools (प्रवीण पाटील, फिरोज मुजावर, सदाभाऊ कुंभार ), beauty parlour tips, making gift आर्टिकल्स, पाककला (ज्योती दाणी ),10वी व 12 वी नंतरचे करिअर, (अमित खत्री ) measurement systems, measurement units (गोपाळ कुलकर्णी ), 5S, Quality management systems (अशोक येवले ), वूमन empowerment (उषा येवले ), ऑटोमोटिव्ह harness (राजकुमार मुनोत ), फोटोग्राफी (रोहन पाखले ), भौमित्तिक  रचनेतून इंजीनीरिंग drawing  ची माहिती (सुरेश पाचारणे, हनुमंत गायकवाड) अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

या कार्यशाळांबरोबरच कॉम्पुटर इन्स्टिटयूटमधील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी शोधणे, शाळांमधून वर्षभर राबविल्या जाणाऱ्या प्रोजेक्टमधून विद्यार्थी व शिक्षकांना “project management “ची ओळख करून देणे, विज्ञानवाहिनीच्या माध्यमातून शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे, गोदरेज कंपनीच्या CSR मार्फत चालविल्या जाणाऱ्या 6 दिवसाच्या “व्यक्तिगत विकास व furniture assembly ” या certified कोर्समध्ये  गरजू विद्यार्थ्यांना सामावून घेणे या उपक्रमांचाही समावेश केला.

21 कार्यशाळांच्या माध्यमातून 3800 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता आल्याचा आनंद हा शब्दापलीकडचा आहे. तो वर्णन करता येत नाही, अनुभवावा लागतो असेही, एम जे एफ लायन अशोक येवले यांनी सांगितले

कौशल्य विकास प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याबद्दल लायन्स क्लब इंटरनॅशनलचे appreciation सर्टिफिकेट, मल्टिपल चे silvar अवॉर्ड व  डिस्ट्रिक्टचे तीन मानांकित पुरस्कार –(Best lion of the District, Best contribution as Cabinet officer व Best contribution in Signature project ) लायन  अशोक  येवले व त्यांच्या सहकाऱ्यांना देऊन गौरविण्यात आले.

पुढील 5 वर्ष हे कार्य असेच चालू राहील. ग्रामीण भागात स्कील डेव्हलोपमेंट सेंटर उभी राहावीत हे आमचे स्वप्न आहे.
मोनाली, प्रज्ञा यांचेही या यज्ञात भरीव योगदान आहे. सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहे. परंतू योजना व अंमलबजावणी यातील दरी आपणास माहित आहे. सेवाभावी संस्थांचे योगदान Young India mission साठी महत्वाचे आहे.

या उपक्रमासाठी लायन ओमप्रकाश पेठे, लायन हरी नायर  व नंदकिशोर जगदाळे यांचे प्रोत्साहन मिळाले. क्लब अध्यक्षा लायन सविता निंबाळकर, सचिव लायन मंजिरी कुलकर्णी, खजिनदार लायन शिवकन्या मुसमाडे व सर्व सभासदांचा सक्रीय सहभाग मोलाचा होता.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *