Pimpri news : यंदा दिवाळीत आगीच्या घटनात घट

Pimpri news : यंदा दिवाळीत आगीच्या घटनात घट
Pckhabar – दरवर्षी दिवाळीत फटाक्‍यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. परंतु यावर्षी फटाके फोडण्याचे प्रमाण घटल्याने आगीच्या घटनांमध्येही घट झाली आहे.

फटाक्‍यामुळे व अन्य कारणाने 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आगीच्या सहा घटना घडल्या आहे. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असून कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले आहे.
यंदा करोनामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर शासनाकडून बंदी घालण्यात आली. गेल्या पाच वर्षात दिवाळी दरम्यान 94 आगीच्या घटना घडल्या आहेत. यंदा 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान शहरातील दापोडी, काळेवाडी, बालाजीनगर, भिमाशंकर, दिघी, रुपीनगर, झेंडाचौक चिखली आदी ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहे.

दरवर्षी विविध प्रकारच्या फटाक्‍यांच्या ठिणग्यांमुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून या घटनांमध्ये घट होताना दिसत आहे. यावर्षी कोरोनामुळे अनेकजण बाधित झाले आहेत. फटाक्‍याच्या धुराचा रुग्णांना त्रास होऊ शकतो, यामुळे फटाक्‍याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाची सायंकाळ सोडल्यास यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी फटाके फोडण्यात आले. गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहता 2015 आणि 2016 साली आगीच्या घटना अधिक घडल्या होत्या. गेल्या वर्षीपासून आगीच्या घटना कमी होताना दिसत आहेत.

गेल्या पाच वर्षातील आगीच्या घटना

2015- 29
2016- 25
2017-09
2018-19
2019-06
2020-06

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *