Talegaon Dabhade news :  ‘पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला’

Talegaon Dabhade news :  ‘पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला’

Pckhabar-‘पुणे पदवीधर मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून तो यावेळी देखील मोठ्या मताधिक्याने जिंकणार’ असल्याचा विश्वास  महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदार संघातील संग्राम देशमुख व शिक्षक मतदार संघातील जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी येथील वैशाली मंगल कार्यालयात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव, जालिंदर कामठे, धर्मेंद्र खंडारे, किरण दगडे, रामविलास खंडेलवार, रघुवीर शेलार, बाळासाहेब शेलार, निकिता घोटकुले, सायली बोत्रे, दत्तात्रेय शेवाळे, शिवाजी पवार, संदीप काकडे, ॲड.रवींद्र दाभाडे तसेच तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील यांनी महाआघाडी सरकारच्या कार्यपद्धती व कारभारावर सडकून टीका केली. यामध्ये वीज व वीज बिल या संदर्भात असलेले धोरण, मराठा आरक्षणाच्या संदर्भात असलेले धोरण, तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली. याबद्दल कडक शब्दात महाआघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले. महाविकासआघाडीच्या कामकाजाचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप  पाटील यांनी केला.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे. यामुळे इच्छुक उमेदवार असताना देखील रविंद्र भेगडे यांनी बिनशर्त कामाची तयारी दर्शवली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यावरती चक्रीवादळ, परतीचा पाऊस तसेच कोरोना विषाणू आदी संकटे आली, असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये योद्धा म्हणून काम केले.

यावेळी शहरी, ग्रामीण पदाधिकारी यांनी आपल्या कामाचा आढावा सदर केला. यामध्ये तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मोठे मताधिक्य राहील असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक रवींद्र भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र साबळे यांनी केले. तर आभार किरण राक्षे यांनी मानले.

‘राष्ट्रवादी पक्ष म्हणजे थंडा मामला’

राष्ट्रवादी पक्षाने  निवडणूक सोडून दिली का? उमेदवार आहे कि नाही? असे प्रश्न काहीजण मला विचारतात. त्यावेळी मी त्यांना म्हणालो राष्ट्रवादी पक्ष म्हणजे थंडा मामला आहे. ते शेवटच्या क्षणी प्रयत्न करतात अशी टीका पाटील यांनी केली.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)