Maharashtra news : दिंड्या आणि पालख्यांना बंदी; कार्तिकीवारी पार्श्वभूमीवर निर्णय

Maharashtra news : दिंड्या आणि पालख्यांना बंदी; कार्तिकीवारी पार्श्वभूमीवर निर्णय

Pckhabar-येत्या 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात. या सर्व सोहळ्यांना राज्य शासनाने बंदी घातली असून राज्याचे विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु.प. साळुंखे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.
16 नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला या निर्णयाचे भक्तांनी जोरदार स्वागत केले.
कोरोना विषाणू संबंधित सर्व नियम पळून भाविकांना मंदिरात दर्शन दिले जात आहे.
मात्र यात्रा, जत्रा आणि वारी यावर शासनाने निर्णय घेतलेला नाही.
येत्या 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूरची कार्तिकी वारी आहे पंढरपूर मध्ये भरणाऱ्या चार वाऱ्यातील ही क्रमांक दोन ची वारी आहे साधारण पाच ते सात लाख वारकरी भाविक या वारीला हजेरी लावतात.
एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रित जमले तर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो आणि वारीला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका पोहचू शकतो.
ही शक्यता गृहीत धरुन राज्य शासनाने कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना बंदी घातली आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढीवारीला असे नियम लावण्यात आले होते आणि वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्यात आली होती.
यावेळी कार्तिकी वारी देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्याच्या हालचाली वारकरी संप्रदायात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *