Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिर शाळेत नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पेन देऊन स्वागत

Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिर शाळेत नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पेन देऊन स्वागत


Pckhabar-कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज (सोमवार) पासून सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी तळेगाव दाभाडे, यशवंतनगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थानिक नगरसेवक निखिल भगत यांनी पेन देऊन स्वागत केले. तसेच भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी पाट्य पुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी सरस्वती विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे, सौ.ज्योती चोळकर मुख्याध्यापिका रेखा परदेशी, राजेश बारणे, अ‍ॅड. संविद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक निखिल भगत म्हणाले’’कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दिड वर्षांपेक्षा अधिक शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी घरात बंदिस्त राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे मोठे जिकरीचे होत होते. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने सरकारने 8 वी ते 10 वीचे वर्ग सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येऊन नक्कीच आनंद होणार आहे. त्यांचा आनंद व्दिगुणात होण्यासाठी पहिल्या दिवशी पेन देऊन त्यांचे स्वागत केले आहे. तसेच सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या पाट्यपुस्तकांचेही पहिल्याच दिवशी वाटप केले आहे.’’

विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर पाळावे, मास्क घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही नगरसेवक भगत यांनी केले.