Talegaon Dabhade Crime News : रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 39 लाखांंची फसवणूक

Talegaon Dabhade Crime News : रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 39 लाखांंची फसवणूक
Pckhabar-एका टोळीने मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने फी म्हणून 38 लाख 90 हजार रुपये  घेऊन खाजगी क्लासेसमध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग देऊन बनावट जोईनिंग लेटर देणार्‍या 13 हून अधिक जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 नोव्हेंबर 2019 ते एक ऑगस्ट 2021 या कालावधीत यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे घडला.

राहुल ढोलपुरीया, मनीष ढोलपुरिया, संगीता ढोलपुरीया, (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), ब्रह्मकुमार ढोलपुरीया, संतोषकुमार पंडित, रवी, मोहित, दीपकसिंग, रोहित गडलिंगकर, विशाल ट्रॅव्हल्सचे मालक, ट्रेनिंग देणार्‍या इन्स्टिट्यूटचे शिक्षक, महिला आणि इतर जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयूर दिलीप कसबे (वय 34, रा. त्रिमूर्तीनगर, मळवली, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी आणि इतर उमेदवारांना मिनिस्ट्री कोट्यातील रेल्वे टीसी व इतर पदासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मिनिस्ट्री कोट्यातील फी म्हणून सर्वांकडून 38 लाख 90 हजार रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर फिर्यादी व इतर उमेदवारांना खाजगी क्लासेसमध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग दिले. त्यानंतर मयुर यांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन कोणतीही नोकरी न देता फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *