Akurdi Crime News :
महिलेच्या घरात घुसून टोळक्याचा हौदोस; तलवारीने काच फोडत पैसे लुटले
Pckhabar-सात जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत तलवार व लोखंडी कोयत्याने खिडकीची काच फोडून दहशत निर्माण करत महिलेच्या पर्समधील 2100 रूपये लुटून नेले. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास आकुर्डीतील पांढारकर चाळ येथे घडली.
अविनाश उर्फ तोत्या पांढारकर, बोन्या उर्फ बोनुप्रसाद हंसराज जयस्वाल, संपत उर्फ पप्या महाबली जयस्वाल, अजित छोटेलाल जयस्वाल, रूपेश रायसाहेब जयस्वाल, प्रतिक महादेव वाघ, आदित्य संतोष जयस्वाल (सर्व रा. सुभाष पांढारकर चाळ, आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सायंकाळी घरात असताना आरोपी तलवार, लोखंडी कोयते घेऊन घरात घुसत खिडकीची काच फोडली. त्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या पर्समधील 2100 रूपये जबरदस्तीने लुटून नेले. फौजदार माकणे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply