Bhosari crime news: नांदण्याच्या कारणावरून सुनेसह माहेरच्या नातलगांचा सासरच्या घरात राडा Pckhabar- नांदण्याच्या कारणावरून सुनेसह दहा जणांच्या टोळक्याने सासरच्या घरात राडा घातला. घरात तोडफोड करून सासरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २० मार्च रोजी खंडोबा माळ, भोसरी येथे घडला. याबाबत काल तक्रार दाखल करण्यात आली आहे. सून, सुनेची आई, सुनेची बहिण, सुनेची आजी, सुनेचे वडील, दोन सामाजिक कार्यकर्ते ...

Pimpri crime news: ‘जेलमधून सुटून आलोय, तुला सोडणार नाही’ Pckhabar- एकाच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत त्यांच्या आईचा विनयभंग केला. तसेच मी आत्ताच जेलमधून सुटून आलो आहे, तुला सोडणार नाही, अशी धमकी देत महिलेला मारहाण केली. ही घटना नेहरूनगर येथे घडली. विजय धनाजी पवार, प्रकाश नामदेव तांदळे (दोघेही रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...

Pimpri news: शहर परिसरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कारभार प्रश्नचिन्ह Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज सरासरी सात वाहने चोरीला जात आहेत. तर वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल 222 वाहने चोरीला गेली आहे. जानेवारी महिन्यात 126 वाहने चोरीला गेली. तर फेब्रुवारी महिन्यात ...

Bhosari crime news: रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्‍या बड्डे बाॅयसह सहा जणांवर गुन्हा Pckhabar-सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून आरडा ओरडा करत, फटाके फोडून सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्‍या बड्डे बॉयसह सहा तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणे भोसरीतील तरूणांना चांगलेच भोवले आहे. हा प्रकार भोसरीतील सखुबाई गभाजी गवळी उद्यान, सार्वजनिक रस्त्यावर घडला. अतुल गोकूळ शिंदे (वय 25, रा. खंडोबामाळ, भोसरी), गौरव ...

Wakad crime news: डॉक्टरची एक लाखाची फसवणूक Pckhabar-दोघांनी कंपनीचे मालक असल्याचे सांगत क्लिनीकच्या कामासाठी लागणारे हायड्रोथेरपीचे मशीन देण्याचे अश्वासन देऊन डॉक्टरकडून 92 हजार रूपये घेत मशीन न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. प्रदीप, महेश सत्रा (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रिन्स प्रभाकर त्रिपाठी (वय-25, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी) ...

Wakad crime news:  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की, आरोपीला अटक Pckhabar-जमिनीची मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना आणि  पोलिसांना सुचना देणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला एका ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मारण्यासाठी अंगावर धावून येत त्यांच्या पिस्तूलची कॉर्ड ओढून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार वाकड येथे गुरूवारी घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजय निवृत्ती वाघमारे (वय-60, रा. वाकड गावठाण) असे ...

Crime News: मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळPckhabar-मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारिरीक आणि मानसिक छळ करत शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमरदिपसिंह मख्खनसिंग सोडी, सासू बलबीरकौर मख्खनसिंग सोडी,सासरे मख्खनसिंग सोडी, नणंद हरप्रितकौर सिंधाना (सर्व रा. पिंपळे सौदागर) ...

Bhosari crime news: दोन महिलांचे पावणेदोन लाखांचे मंगळसुत्र हिसकावलेPckhabar-पतीसह दुचाकीवरून जाणार्‍या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तरूणांनी पावणेदोन लाखांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. या दोन्ही घटना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. पहिल्या घटनेप्रकरणी राजेंद्र किसन पवार (वय-44, रा. मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते आपल्या पत्नीसह पुणे-नाशिक रोडवरून सासुरवाडी हॉटेलसमोरून जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या ...

Talegaon Dabhade crime news: जुन्या भांडणातून चहा विक्रेत्यावर तलवारीने वारPckhabar- जुन्या भांडणातून एका चहा विक्रेत्याला पाच जणांच्या टोळक्यांनी कोयता, तलवारीने डोक्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता तळेगावातील जिजामाता चौकात घडली.सुरज नितीन टेकवडे (वय-28, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) असे गंभीर जखमी झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे. त्याने तळेगाव पोलीस ठाण्यात ...

  Wakad crime news: लग्न मोडल्याच्या रागातून तरूणीचा विनयभंग, कुटुंबियांना धमकीPckhabar- लग्न मोडल्याच्या रागातून तरूणाने तरूणीचा पाठलाग करून विनयभंग करत तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. तसेच धमकी देत तिच्या होणार्‍या नवर्‍याला इन्स्टाग्रामवरून बदनामीकारक मॅसेज पाठविला. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला आहे. बॉनी पिल्ले (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने वाकड पोलीस ...