Bhosari crime news: रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्या बड्डे बाॅयसह सहा जणांवर गुन्हा
Pckhabar-सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून आरडा ओरडा करत, फटाके फोडून सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्या बड्डे बॉयसह सहा तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणे भोसरीतील तरूणांना चांगलेच भोवले आहे. हा प्रकार भोसरीतील सखुबाई गभाजी गवळी उद्यान, सार्वजनिक रस्त्यावर घडला.
अतुल गोकूळ शिंदे (वय 25, रा. खंडोबामाळ, भोसरी), गौरव डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), संकेत डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), दादु गव्हाणे (रा. भोसरी), अनिकेत गायकवाड (रा. दिघीरोड, भोसरी), राहुल गाढवे (रा. दिघीरोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र दत्तात्रय जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल शिंदे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजन तोंडाला मास्क न लावता एकत्र जमले होते. मोटर सायकलवर केक कापून मोठ मोठ्याने आरडाओरडा करत फटाके फोडून परिसरातील शांतता भंग केली. कोरोना संसर्गजन्य आजाराचे नियमाचा भंग केला. तर आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.
Bhosari crime news: रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्या बड्डे बाॅयसह सहा जणांवर गुन्हा










Leave a Reply