Bhosari crime news: दोन महिलांचे पावणेदोन लाखांचे मंगळसुत्र हिसकावले

Bhosari crime news: दोन महिलांचे पावणेदोन लाखांचे मंगळसुत्र हिसकावले
Pckhabar-पतीसह दुचाकीवरून जाणार्‍या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तरूणांनी पावणेदोन लाखांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. या दोन्ही घटना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

पहिल्या घटनेप्रकरणी राजेंद्र किसन पवार (वय-44, रा. मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते आपल्या पत्नीसह पुणे-नाशिक रोडवरून सासुरवाडी हॉटेलसमोरून जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 63 हजार 497 रूपयांचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला.

दुसर्‍या घटनेप्रकरणी पुजा संतोष शिंदे (वय-33, रा. भोसरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे पती दुचाकीवरून स्पाईन रोडने जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अऩोळखी तरूणांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले.

दोन्ही घटनांचा एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.