Wakad crime news: डॉक्टरची एक लाखाची फसवणूक
Pckhabar-दोघांनी कंपनीचे मालक असल्याचे सांगत क्लिनीकच्या कामासाठी लागणारे हायड्रोथेरपीचे मशीन देण्याचे अश्वासन देऊन डॉक्टरकडून 92 हजार रूपये घेत मशीन न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.
प्रदीप, महेश सत्रा (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रिन्स प्रभाकर त्रिपाठी (वय-25, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. त्रिपाटी यांचे कोकणे चौकात प्रिन्स फिजीओथेरपी क्लिनीक आहे. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही रॉनिक सॅनिटेशन कंपनीचे मालक आहोत. क्लिनीकसाठी हायड्रोथेरपीचे मशीन तुम्हाला देवू शकतो, असे अमिष दाखविले. त्या मशीनसाठी 92 हजार रूपये अॅडवान्स म्हणून घेतले. मात्र, मशीन न देता त्यांची फसवणूक केली. फौजदार बाबर तपास करत आहेत.















Leave a Reply