Pimpri crime news: ‘आत्ताच जेलमधून सुटून आलोय, तुला सोडणार नाही’

Pimpri crime news: ‘जेलमधून सुटून आलोय, तुला सोडणार नाही’
Pckhabar- एकाच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत त्यांच्या आईचा विनयभंग केला. तसेच मी आत्ताच जेलमधून सुटून आलो आहे, तुला सोडणार नाही, अशी धमकी देत महिलेला मारहाण केली. ही घटना नेहरूनगर येथे घडली.

विजय धनाजी पवार, प्रकाश नामदेव तांदळे (दोघेही रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार हा फिर्यादी यांचा  तोंडओळखीच्या आहे. त्यांनी आरोपीच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क केली होती. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ केली. आईचा हात धरून विनयभंग केला. तसेच मी आत्ताच जेलमधून सुटून आलो आहे, तुला सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपी तांदळे याने महिलेला मारहाण केली.   फौजदार सुर्यवंशी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *