Dehu News: अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Dehu News: अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Pckhabar-श्री क्षेत्र देहुगाव आणि परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार सुविधा मिळाव्यात यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका देहूकरांच्या सेवेत आज रविवार लोकार्पण करण्यात आले.

श्री क्षेत्र देहू परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सेवेत अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.अशा संकटसमयी आरोग्य सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे, देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, माजी सभापती हेमलताताई काळोखे, रायगड राष्ट्रवादी निरीक्षक ॲड.रुपालीताई दाभाडे, सरपंच पुनमताई काळोखे, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव, माजी सरपंच सुनिताताई टिळेकर, अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान हभप नितीन महाराज मोरे, विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, शिवसेना ज्येष्ठ नेते रमेशभाऊ हगवणे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल हगवणे, देहूरोड महिला अध्यक्षा शितलताई हगवणे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देहु वैशालीताई टिळेकर, हभप जालिंदर महाराज काळोखे तसेच इतर मान्यवर, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

देहू नगरपंचायत, आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदे मार्फत ग्रामपंचायत वित्त आयोग निधीतून आणि जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या पाठपुराव्याने ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली.