Chinchwad news: चिंचवडेनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 110 बाटल्या रक्त संकलित

ही बातमी शेअर करा.

Chinchwad news: चिंचवडेनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 110 बाटल्या रक्त संकलित
Pckhabar-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून माजी उपमहापौर सचिनदादा चिंचवडे युथ फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था पिंपरी चिंचवड या संस्थांच्या वतीने चिंचवडेनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  रक्तदान शिबिरात 110 बाटल्या रक्त संकलित झाले. रक्तदान शिबिरादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.

        आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक पुणे यांचे रक्त संकलित करण्यासाठी सहकार्य मिळाले. रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सचिन चिंचवडे व बंडू मारकड पाटील यांनी समाधान व्यक्त करीत रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच इतर सामाजिक संस्थांनी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सचिन चिंचवडे, लिलाधर मगरे, बंडू मारकड पाटील, युवराज वाल्हेकर, व्यंकटेश वाघमोडे, सचिन कोपनर, नागनाथ वायकुळे, संजय कवितके आदी उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.