Bhosari news: ’यशवंतराव चव्हाण हे सामान्य लोकांचे असामान्य नेतृत्व’  

Bhosari news: ’यशवंतराव चव्हाण हे सामान्य लोकांचे असामान्य नेतृत्व’
Pckhabar-स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे सामान्य लोकांचे नेतृत्व होते.  समाजातील सामान्य माणूस व्यावहारिक पातळीवर शैक्षणिक नेतृत्वाने असामान्य कर्तृत्व करू शकतो, हे आपल्याच कृष्णाकाठ या आत्मचरित्रातून यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले.  सामान्य परिस्थिती असताना व्यवहार आणि चारित्र्य या मूल्यांची जोपासना केली तर सामान्य माणूस देखील आपली व समाजाची परिस्थिती बदलू शकतो आणि हे काम यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजासमोर नवा आदर्श निर्माण करून दिला. त्या आदर्शाचे पाईक होण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी काढले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, अभ्यास केंद्र क्र. 62471 प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. गौतम भोंग-राजमाता जिजाऊ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी, महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा.दीपक पावडे, प्राचार्य सदाशिव कांबळे, केंद्र संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर, केंद्र सहाय्यक प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.

  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचा जाणता राजा होते; कारण समाजातील असे एकही क्षेत्र नव्हते की त्या क्षेत्रामध्ये दूरदृष्टी नव्हती.  आजही महाराष्ट्राचे शिल्पकार ही उपाधी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जाते.  चारित्र्यसंपन्न आणि पारदर्शकता यशवंतराव चव्हाणांची जगण्याची मूल्यं होती. समाजातील प्रत्येक व्यक्तीने चारित्र्यसंपन्न आणि व्यावहारिक पातळीवर पारदर्शकता आणली तर यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र खर्‍या अर्थाने अवतीर्ण होईल यात शंका नाही, असे मत प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. पांडुरंग भास्कर म्हणाले की, 2015-16 पासून महाविद्यालयात एम. ए, एम. कॉम व एमबीए अभ्यासक्रम यशस्वी रित्या सुरू असून परीक्षेचा निकाल हा 100 टक्के आहे.

  सूत्रसंचालन प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रशांत रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजय निकम, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.  स्वाती वाघ, प्रा. सचिन पवार,  प्रा. महालक्ष्मी शिरसाट, सारिका बेलदोर, प्रा. रुपाली आगळे, प्रा. लांडगे उमेश, प्रा. सविता सकपाळ उपस्थित होते.