Dehu news: वीज कनेक्शन तोडल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण

Dehu news: वीज कनेक्शन तोडल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण
जिवे मारण्याची धमकी, तिघांना अटक
Pckhabar- व्यावसायिक वीजबिल थकीत असल्याने वीज कनेक्शन तोडल्यामुळे तिन भावांनी महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार देहूगाव येथे गुरूवारी सकाळी घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

दिपक पांडुरंग चव्हाण (वय-36), निखील पांडुरंग चव्हाण (वय-28), विक्रम पांडुरंग चव्हाण (वय-30, तिघे रा. महालक्ष्मीनगर, देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदिप विठ्ठल रोडे (वय-26) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचे व्यावसायिक वीज बिल थकले होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे सहकारी मारोती किशनराव गडदे यांनी आरोपींचे वीज कनेक्शन तोडले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व गडदे यांनी शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींना त्वरीत अटक केली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.