Maval news: संदीप शिंदे यांचा जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते सत्कार

ही बातमी शेअर करा.

Maval news: संदीप शिंदे यांचा जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते सत्कार

Pckhabar- मावळातील साते ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख संदीप शिंदे यांची साते ग्रामपंचायत सदस्यपदी बिन विरोध निवड झाली. त्याबद्दल पुणे जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या महिला संघटिका शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी नगरसेवक सुनंदाताई आवळे, उपतालुका प्रमुख रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शैलाताई खंडागळे म्हणाल्या,
संदीप शिंदे यांची साते गावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने आपणाला आनंद झाला आहे. संदीप हा राजकारणात आणि समाजकारणात चांगले कार्य करेल, अशी आपल्याला खात्री आहे. संदिपच्या पुढील कार्यास आपल्या मनापासून शुभेच्छा.


ही बातमी शेअर करा.