Talegaon Dabhade News : ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात यशवंतनगर दुमदुमले

Talegaon Dabhade News : ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात यशवंतनगर दुमदुमले

संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम

pckhabar- तळेगाव दाभाडे येथील यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रकटदिन सोहळ्याचे भक्तिभावाने माेठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या प्रकटदिन सोहळ्यात दाेन हजारांहून अधिक भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.  ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले हाेते.

यशवंतनगरमधील बालाजी मंदिरांच्या पाठीमागे सकाळी नऊपासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. नऊ वाजता महाराजांची पूजा, दुपारी साडेबारा वाजता आरती, त्यानंतर दुपारी 1 ते 3, व सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजपेर्यंत महाप्रसाद, साडेपाच वाजता ह. भ. प. शिवशंभुचरित्रकार साेमनाथ महाराज भालेराव यांचे किर्तन झाले. त्यांना आळंदी देवाची येथील संत कृपा ज्ञानदान अन्नदान संस्थेचे बाल वारक-यांनी साथ दिली.

दरम्यान, सायंकाळी सात वाजता ‘श्रीं’ ची तळेगाव दाभाडे शहराचे नगराध्यक्ष संताेष दाभाडे, उपाध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते महाआरती झाली.

संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. यशवंत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी, स्थानिक नागरिकांनी केलेल्या चोख नियोजनामुळे संपूर्ण सोहळा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याची माहिती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *